शुक्ल यजुर्वेदाच्या (वाजसनेयी माध्यंदिन संहिता ) चौतिसाव्या अध्यायातील पहिले सहा मंत्र हे शिवसंकल्पसूक्त म्हणून ओळखले जातात.तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु | असे ध्रुवपद या सहाही मंत्रांच्या शेवटी आले आहे.या सूक्ताला उपनिषद म्हणूनही संबोधिले जाते.शिवसंकल्प हा या सूक्ताचा ऋषी असून मन ही त्याची देवता आहे.
....... अशा माझ्या मनात कल्याणाचे संकल्प येवोत अशी प्रार्थना येथे केलेली आहे. या प्रार्थनेमध्ये सूक्तकर्त्या ऋषीने कल्याण असे म्हणत असताना नेमके काय अपेक्षित आहे असे मात्र स्पष्टपणे नोंदविलेले दिसत नाही.
शिवसंकल्प सूक्त
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.