अष्टांगिक मार्ग (पाली: अरियो अठ्ठ्ंगिको मग्ग) हा गौतम बुद्धांनी सांगितलेला वासना, राग,द्वेष, इत्यादी दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग आहे. याला मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात.
बौद्ध धर्माच्या शिकवणुकीत अष्टांगिक मार्गाला फार महत्त्व आहे. अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अवलंब केला तर मानव निर्वाण प्राप्त करू शकतो. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही कल्पना समजावून देताना म्हणले आहे की, निर्वाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्या प्रवृत्तींवर असणे. निब्बाण (निर्वाण) म्हणजे निर्दोष जीवन. काम, क्रोध, द्वेष वगैरे दोष आपले जीवन दूषित करून सोडतात. हे दूर करून जीवन निर्मळ करण्याचा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग. हा मार्ग मानवाला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो, ज्ञान देतो. त्यामुळे मनाला शांती लाभू शकते. मानवाच्या दैनंदिन जीवनात मानव या मार्गाने जितकी वाटचाल करतील तितके जीवन अधिक आनंदी होत जाईल.
अष्टांगिक मार्ग
१) सम्यक् दृष्टी :- नैसर्गिक नियमांिरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही ही गोष्ट मानणे.
२) सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.
३) सम्यक् वाचा :- दयाशील व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.
४) सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
५) सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
६) सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.
७) सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून मनाला सजग ठेवणे.
८) सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन दूर ठेवून मनाला प्रसन्न आणि शांत ठेवणे
अष्टांगिक मार्ग
या विषयावर तज्ञ बना.