मंत्रपुष्पांजली (संस्कृत: मन्त्रपुष्पाञ्जलि, IAST: mantrapuṣpāñjali, IPA: \mɐn̪t̪rɐpuɕpɑːɲɟɐli\) ही भारतातील एक लोकप्रिय प्रार्थना आहे. याचा एक अर्थ "फुलांची ओजळी अर्पण करणे" असा होतो. यात वैदिक स्त्रोतांमधील चार स्तोत्रे समाविष्ट आहेत. मंत्रपुष्पांजली ही आरतीच्या शेवटी गायली जाणारी अंतिम प्रार्थना आहे. मंत्रपुष्पांजली हा शब्द तीन घटकांनी बनलेला आहे, मंत्र, पुष्प आणि अंजली (हाताची ओंजळ).
मंत्रपुष्पांजली हे वैदिक परंपरेच्या शुक्ल यजुर्वेद शाखेतील देवें नावाच्या पारंपारिक पठणाच्या संचाचे एक परिशिष्ट आहे. सार्वभौम राजा आणि त्याची समृद्ध प्रजा यांच्या कल्याणाची प्रार्थना यामध्ये आहे. सार्वभौम राजा आणि त्याचे साम्राज्य सर्वथा स्वतंत्र, परमेश्वराशी निष्ठावंत सर्वसमावेशक असो अशी अपेक्षा यामध्ये व्यक्त केली गेली आहे. देवें मधील काही निवडक स्तोत्रांपासून मंत्रपुष्पांजलीची निर्मिती करण्यात आलेली आहे. मंत्रपुष्पांजलीचे स्तोत्र अत्यंत संथ गतीने जपले जातात, सर्व दीप स्वरित ( संस्कृत, देवनागरी दीर्घस्वरित) उच्चार नेहमीपेक्षा जास्त वाढवतात.
मंत्रपुष्पांजली
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.