शिवराम हरी राजगुरू (जन्म: राजगुरुनगर, पुणे, २४ ऑगस्ट १९०८; मृत्यू: लाहोर, २३ मार्च १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख क्रांतिकारक होते. ते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एचएसआरए) चे सदस्य होते. चंद्रशेखर आझाद, भगत सिंग आणि सुखदेव थापर यांच्यासोबत त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र लढा दिला. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी भगत सिंग यांच्यासोबत १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर येथे ब्रिटिश पोलिस अधिकारी जॉन साँडर्स याची हत्या केली. २३ मार्च १९३१ रोजी भगत सिंग आणि सुखदेव यांच्यासह त्यांना लाहोर तुरुंगात फाशी देण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिवराम हरी राजगुरू
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.