शिरूर अनंतपाळ हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.हा २३ जून १९९९ साली तालुका म्हणून अस्तित्वात आला.हा मांजरानदीच्या खोऱ्यात तसेच घरणी नदीच्या पात्रा लगत हा तालुका वसलेला आहे,या तालुक्याचे मुख्य ठिकाण शिरूर(अनंतपाळ) आहे.हे ठिकाण तालुक्याच्या मध्य ठिकाणी स्थित आहे.येथे अनंतपाळ (महाराजाचे) देवाचे भव्य असे पौराणिक मंदिर आहे.हे येथील गावचे ग्रामदैवत आहे.याला आधी भोजराज शिरूर म्हणून संबोधले जायचे,पण कालांतराने भोजराज नाव कमी करून येथील ग्रामदैवत अनंतपाळ (महाराज) यांच्या नावावरून भोजराज शिरूर चे नवीन नाव ॥ शिरूर अनंतपाळ ॥ असे पडले.तसेच येरोळ येथे श्री कालिंकामातेचे भव्य असे मंदिर आहे.हे मंदिर निसर्गरम्य परिसरात आहे..
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिरूर अनंतपाळ तालुका
या विषयावर तज्ञ बना.