शिरस्त्राण

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

शिरस्त्राण म्हणजे डोके सुरक्षित राखण्यासाठी वापरला जाणारा संरक्षक टोप किंवा शिरोकवच असे सामान्यपणे म्हणता येईल. सैनिकी शिरस्त्राणे फार पूर्वीपासून वापरात आहेत. आधुनिक काळात नागर समाजातही शिरस्त्राणे वापरली जातात. आधुनिक औद्योगिक क्षेत्रातील खाणकामगार, बांधकाम-कामगार तसेच अग्निशामकदलाचे कर्मचारी इ. व्यक्ती विशिष्ट शिरस्त्राणांचा उपयोग करतात. अवकाश-संशोधन क्षेत्रातील अंतराळवीरही विशिष्ट प्रकारचे शिरस्त्राण वापरतात. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीसदलातील पोलीस व अधिकारिवर्ग दंगली, निदर्शने, हरताळ यांसारख्या प्रसंगी शिरस्त्राणे वापरतात. दुचाक्यांचे वाहक, मोटार स्पर्धेतील स्पर्धक, त्याचप्रमाणे विविध क्रीडाप्रकारांतील व खेळातील खेळाडू हेदेखील विशिष्ट प्रकारची शिरस्त्राणे वापरतात. सैनिकी व नागरी क्षेत्रांत वापरण्यात येणारी शिरस्त्राणे, ही त्या त्या क्षेत्रातील शारीरिक व विशेषतः शिरोभागीय धोके लक्षात घेऊन तयार करण्यात येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →