शिरपूर हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याचे मुख्यालय आहे. शिरपूर तालुका हा संपूर्ण खान्देशात एक विकसित तालुका म्हणून ओळखला जातो.
शिरपूर गावात औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणाच्या सोयीदेखील आहेत. शिरपूर गावात दोन प्रसिद्ध बालाजी (प्रतितिरुपती) मंदिरे असून खालच्या गावातील व वरच्या गावातील अशा नावाने ती ओळखली जातात, श्री तिरुपती बालाजी नावाने व दरवर्षी खंडेराव देवाच्या नावाने यात्रा भरते. शहरांत प्रभु व्यंकटेश बालाजी मंदिर, पाताळेश्वर मंदिर, खंडेराव मंदिर, माताभवानी मंदिर, अशी मंदिरे असून तीन मशिदी आहेत. शिरपूर तालुक्यातील थाळनेर हे लता मंगेशकर यांचं आजोळ आहे, येथे एक ऐतिहासिक किल्ला आहे.
शिरपूर हे प्रसिद्ध आहे ते येथे सुरू असलेल्या पाणी अडवा पाणी जिरवा ह्या कामांमुळे. ह्या कामांना मुळे "शिरपूर पँटर्न" म्हणून सर्वत्र ओळख मिळाली आहे.
शिरपूर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.