शिखर शिंगणापूर

या विषयातील रहस्ये उलगडा.

शिखर शिंगणापूर

शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या माण (दहिवडी) तालुक्यातील एक गाव आहे. सातारा, सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक ऐतिहासिक गाव आणि धार्मिक ठिकाण आहे. येथे एक शंभू महादेवाचे मंदिर आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे खाजगी मंदिर म्हणुन देखील हे मंदिर प्रसिद्ध आहे, कारण स्वतः महाराज आणि त्यांचे कुटुंबिय येथे महादेवाच्या दर्शनाकरता येत असत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या मंदिराला दानपत्र दिलेले होते आणि मंदिराची संपूर्ण काळजी आपले दोन्ही छत्रपती घेत असत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →