कावड

या विषयावर तज्ञ बना.

कावड

कावड हे पाण्याच्या दोन घागरी अथवा दोन जड पदार्थ इकडून तिकडे नेण्यासाठी बांबूच्या दोन टोकांना दोऱ्या बांधून त्याखाली वाहून न्यायच्या वस्तू ठेवलेली शिंकाळी असलेले पारंपरिक भारतीय साधन होय. घरोघरी कावडीने पाणी भरून उदर निर्वाह करणाऱ्यांना पाणक्या अथवा पाणेरी म्हणत . शिवाजी महाराज कालीन मराठीत कावड या शब्दासाठी 'आडे' आणि कावड वाहून नेणाऱ्या व्यक्तीस 'आडेकरी' हे शब्द वापरात असावेत. धुण्डिराज व्यासकृत, शिवाजी महाराजांनी बनवून घेतलेल्या राजकोशात धुण्डिराज व्यासांनी 'तुला' आणि 'तुलावाहः' हे पर्यायी शब्द सुचवलेले दिसतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →