शिकारी (२००० चित्रपट)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

शिकारी हा २००० मध्ये प्रदर्शित झालेला एन. चंद्रा दिग्दर्शित भारतीय क्राइम थरारपट आहे. यात गोविंदा, तब्बू, करिश्मा कपूर आणि किरण कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १९९६ मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर साजन चले ससुराल नंतर गोविंदा-तब्बू-करिश्मा या तिघांचा हा दुसरा चित्रपट होता. गोविंदाने पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका निवडली होती तर करिश्मा कपूरने ॲक्शनने भरलेली भूमिका निवडली होती. या काळात गोविंदाला विनोदी भूमिकांमध्ये आणि करिश्माला ग्लॅमरस भूमिकांमध्ये घेतले जात असे. गोविंदाने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच प्रोस्थेटिक मेकअप देखील केला होता.

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर तो बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई करणारा ठरला, परंतु नंतर समीक्षकांनी गोविंदाच्या कामाचे कौतुक केल्यामुळे त्याला लोकप्रियता मिळाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →