नरसिम्हा हा १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील अॅक्शन नाट्य चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शन, निर्मिती, लेखन आणि संपादन एन. चंद्रा यांनी केले आहे. या चित्रपटात सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर उर्मिला मातोंडकर, रवी बहल आणि ओम पुरी यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहे. या चित्रपटाचे संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिले आहे आणि गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली आहेत.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला.
नरसिम्हा (१९९१ चित्रपट)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.