मेजर जनरल शाहनवाझ खान (२४ जानेवारी १९१४ - ९ डिसेंबर १९८३) हे एक भारतीय लष्करी अधिकारी व राजकारणी होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद फौजेमध्ये कामगिरी बजावली होती. कोहिमा व इंफाल येथील आझाद हिंद सेनेच्या यशामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता.
युद्ध संपल्यानंतर ब्रिटिश भारतीय लष्कराने शाहनवाझ खान ह्यांच्यावर कोर्ट मार्शलचा खटला भरून त्यांना मृत्यूदंड ठोठावला होता. परंतु जनक्षोभामुळे भारतीय लष्करप्रमुखांनी ही शिक्षा रद्द केली.
त्यानंतर शाहनवाझ खान ह्यांनी महात्मा गांधींच्या अहिंसा तत्त्वाचा अंगिकार केला व काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. ते १९५२, १९५७, १९६२ व १९७१ ह्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या मेरठ लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आले.
१९८३ साली दिल्ली येथे वयाच्या ६९व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
शाहनवाझ खान
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.