शाह बानो प्रकरण किंवा शाह बानो खटला, हा भारतातील एक पोटगीचा विवादास्पद खटला होता. याला मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाह बानो बेगम खटला असेही म्हणतात. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पीडित घटस्फोटित मुस्लिम महिलेला दिलेल्या देखभालीच्या बाजूने निर्णय दिला होता. तत्कालीन राजीव गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने घटनेत बदल करत मुस्लिम महिला (घटस्फोट अधिकारांचे रक्षण) कायदा, १९८६ लागू केला. भारतीय धर्मनिरपेक्ष कायद्यांतर्गत मुस्लिम महिलांना मूलभूत देखभालीचा अधिकार नाकारण्यात आल्याने याला भेदभावपूर्ण आणि मुस्लिम तुष्टिकरणाचा भाग म्हणून पाहिले गेले.
इंदूर, मध्य प्रदेश येथील शाह बानो बेगम यांना १९७८ मध्ये तिच्या पतीने घटस्फोट दिला होता. तिने भारताच्या सर्वोच्च न्यायालया पर्यंत पोटगीच्या फौजदारी खटल्यात अंतिम विजय मिळवला, ज्यामध्ये तिने तिच्या पतीकडून पोटगीचा अधिकार जिंकला. मात्र, काही मुस्लिम राजकारण्यांनी हा निकाल रद्दबातल ठरवण्यासाठी मोहीम राबवली. या प्रकरणातील महिलेच्या बाजूने निकाल दिल्याने मुस्लिमांमध्ये टीका झाली. , ज्यापैकी काहींनी कुराणचा हवाला देऊन हा निकाल इस्लामिक कायद्याच्या विरोधात असल्याचे दाखवले. त्यामुळे भारतात विविध धर्मांसाठी वेगवेगळ्या नागरी संहिता असण्याबाबत वाद निर्माण झाला.
या प्रकरणामुळे काँग्रेस सरकारने आपल्या पूर्ण बहुमताने मुस्लिम महिला (घटस्फोट अधिकारांचे संरक्षण) कायदा, १९८६ संमत केला, ज्याने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सौम्य केला आणि मुस्लिम घटस्फोटकर्त्यांचा त्यांच्या पूर्वीच्या पतीपासून पोटगी मिळण्याचा अधिकार, घटस्फोटानंतर केवळ ९० दिवस (इस्लामिक कायद्यातील इद्दाचा कालावधी) इतकाच मर्यादित केला. तथापि, डॅनियल लतीफी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटला आणि शमीमा फारुकी विरुद्ध शाहिद खान यासह नंतरच्या निकालांमध्ये, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याच्या वैधतेची खात्री करून या कायद्याचा अर्थ लावला आणि परिणामी शाह बानोचा निकाल कायम ठेवला, आणि मुस्लिम महिला (घटस्फोटावरील अधिकारांचे संरक्षण) कायदा १९८६ रद्द करण्यात आला. अखिल भारतीय शिया पर्सनल लॉ बोर्डासह काही मुस्लिमांनी घटस्फोटित मुस्लिम पत्नीच्या पालनपोषणाचा अधिकार निरपेक्ष बनवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे समर्थन केले.
शाह बानो प्रकरण
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!