शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय (बारामती)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व स्वर्गीय अजितदादा पवार सर्वोपचार रुग्णालय, बारामती हे वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालय आहे. ते बारामती, महाराष्ट्र, भारत येथे‌ स्तिथ आहे. याची स्थापना २०१९ मध्ये झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान, नाशिक विद्यापीठाशी संबंधित आहेत. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने वैद्यकीय शिक्षणासाठी हे महाविद्यालय ओळखले जाते.



सध्या, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामतीतर्फे सुमारे १०० विद्यार्थ्यांना पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. महाविद्यालयात पाच मजले आणि पार्किंगची जागा आहे. जनरल हॉस्पिटलमध्ये २१ वॉर्ड आणि १३ ऑपरेशन थिएटर असून पी + जी + ६ मजले आहेत.

महाविद्यालय व सर्वसाधारण रुग्णालयाला महाराष्ट्र शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →