बारामती हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. इतिहासात हे नगर "भीमथडी" या नावाने प्रसिद्ध होते. कृषी हा बारामतीच्या लोकांचा मुख्य व्यवसाय असून ऊस, द्राक्षे व गहू ही येथील व्यापारी महत्त्वाची पिके आहेत. येथून मध्यपूर्वेत व युरोपात द्राक्षे व साखर निर्यात केली जाते. बारामतीला वैभवशाली अशी सामाजिक राजकीय व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे पूर्वीच्या भीमथडी म्हणून ओळखल्या गेलेल्या या शहराला आज एक वेगळा लौकिक प्राप्त झालेला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बारामती
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.