शाखरियार मामेद्यारोव

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

शाखरियार मामेद्यारोव

शहरियार हमीद ओलू मम्मद्यारोव (जन्म: १२ एप्रिल १९८५), आंतरराष्ट्रीय स्तरावर शाखरियार मामेद्यारोव म्हणून ओळखला जाणारा, एक अझरबैजानी बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. सध्या पर्यंत, तो अझरबैजानचा सर्वोत्तम बुद्धिबळपटू आहे. त्याचे वैयक्तिक सर्वोत्तम २८२० गुणांकन त्याला बुद्धिबळ इतिहासातील सहाव्वा सर्वोच्च गुणांकन असलेला खेळाडू बनवते.

मामेद्यारोव्हने २०११ मध्ये (क्वार्टरफायनलमध्ये बाहेर), २०१४ मध्ये (चौथे स्थान) आणि २०१८ मध्ये (दुसरे स्थान) कॅंडिडेट्स स्पर्धेत भाग घेतला आहे. तो दोन वेळेचा ज्युनियर विश्वविजेता (२००३ आणि २००५) आहे आणि २०१३ मध्ये रॅपिड विश्वविजेता होता.

२०१२ च्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये तिसऱ्या पटावरील सुवर्णपदक विजेता असून, तो अझरबैजानसोबत तीन वेळा युरोपीय सांघिक विजेता (२००९, २०१३, २०१७) आहे. तो ताल मेमोरियल (२०१० संयुक्त आणि २०१४ ब्लिट्झ) आणि शामकीर बुद्धिबळ स्पर्धा (२०१६ आणि २०१७) येथे दोन वेळेचा विजेता आहे, तसेच २०१८ च्या बिएल बुद्धिबळ महोत्सवाचा विजेता आहे जिथे त्याने विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला हरवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →