शरद राजगुरू

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

डॉ. शरद नरहर राजगुरू (जन्म : २६ नोव्हेंबर १९३३) हे एक जागतिक कीर्तीचे मराठी भूपुरातत्त्वज्ञ आहेत. त्यांचा जन्म पुण्यात शनिवार पेठेत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी १९५५साली भूशास्त्र या विषयातली पदवी घेतली आणि १९५७साली आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोन महिन्याततच शरद राजगुरू यांनी जमशेदपूर येथे सरकारी नोकरी मिळाली, पण ती लवकरच सोडली. पुण्यातील टाय एक्स्प्लोजिव्ह्ज (एचई), मुंबईतील खंडेलवाल आणि नंतर मुंबईतील मिनिस्ट्री ऑफ सायंटिफिक अँड कल्चरल अफेअर्स अशा ठिकाणीही त्यांनी भूशास्त्रज्ञ म्हणून नोकऱ्या केल्या. पण एकाही नोकरीत ते टिकले नाहीत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →