महाराष्ट्रातल्या अहमदनगर शहरातली शब्दगंध साहित्यिक परिषद ही संस्था हे शब्दगंध साहित्य संमेलन भरवते. शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे सध्या धुरा संभाळत आहेत (२०१९).
यापूर्वी झालेली शब्दगंध साहित्य संमेलने :-
१ले : अहमदनगर, संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर, स्वागताध्यक्ष सुधा कांकरिया, उद्घाटक यशवंत भापकर व अरुण जगताप
२रे : हिवरे बाजार(जिल्हा अहमदनगर), संमेलनाध्यक्ष नामदेवराव देसाई, उद्घाटक रावसाहेब शिंदे
३रे : निंबळक(जिल्हा अहमदनगर), संमेलनाध्यक्ष शिवाजीराव देवढे, उद्घाटक डॉ. रावसाहेब कसबे, स्वागताध्यक्षा लता पवार
४थे : अहमदनगर, ११-२-२००६, संमेलनाध्यक्ष डी..एम. कांबळे, उद्घाटक द्वारकानाथ अष्टेकर, स्वागताध्यक्ष अभय आगरकर
५वे : अहमदनगर, २००७, संमेलनाध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, स्वागताध्यक्ष संदीप कोतकर, उद्घाटक नागनाथ कोत्तापल्ले व प्रभाकर पणशीकर
६वे : अहमदनगर, १७-१८ मे २००८, संमेलनाध्यक्ष संजय कळमकर, स्वागताध्यक्ष शंकरराव घुले, उद्घाटक दिलीप वळसे पाटील
७वे : अहमदनगर, १-२ ऑगस्ट २००९, संमेलनाध्यक्ष कवी फ.मु. शिंदे
८वे : अहमदनगर, २०१०, संमेलनाध्यक्ष कवी प्रकाश घोडके
९वे : अहमदनगर, १६-१०-२०११, संमेलनाध्यक्ष लोककवी प्रशांत मोरे
१०वे : अहमदनगर, ८ डिसेंबर २०१२(नियोजित), संमेलनाध्यक्ष लहू कानडे, स्वागताध्यक्ष राजीव राजळे
११वे : अहमदनगर, अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजीत भालेराव (जानेवारी २०१५)
१२वे : शनिशिंगणापूर, अध्यक्षपदी प्रा. डॉ. अशोक शिंदे (२४-२५ डिसेंबर २०१६)
१३वे : अहमदनगर, अध्यक्षपदी भारत सासणे (२८-२९ जानेवारी २०१८), उद्घाटक माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे
१४वे, अहमदनगर, अध्यक्षपदी ॲड. डाॅ. बाळ ज. बोठे पाटील (१-२ फेब्रुवारी २०१९)
शब्दगंध साहित्य संमेलन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.