शतपावली

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जेवण झाल्यानंतर अन्नपचन व्हावे म्हणून दहा-पंधरा मिनिटे चालणे याला शतपावली असे म्हणतात. 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' असे समर्थांनी यथार्थपणे म्हणले आहे. वैद्यकीय शास्त्रानेदेखील आहाराला आरोग्यासाठी एक मूलभूत अंग मानले आहे. किंबहुना शास्त्रशुद्ध आहार हा आरोग्ययज्ञासाठी आवश्यकच आहे.

यज्ञाची तयारी करण्यासाठी आणि तो झाल्यावर जशा काही गोष्टी धर्मशास्त्राप्रमाणे करायच्या असतात, तशाच आहाराबाबतसुद्धा आहेत. रोजच्या जेवणापूर्वी आणि जेवल्यावर काय करावे आणि काय करू नये, याबाबत वैद्यकीयदृष्ट्या काही संकेत पाळणे आवश्यक समजले जाते.

जेवणानंतर काही विशिष्ट गोष्टी पाळल्यास नक्कीच उपयोगी ठरू शकतात. 'भुक्त्वा शतपदं गच्छेच्छनैस्तेन तु जायते।' म्हणजे जेवल्यावर थोडे चालणे असे म्हणले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →