अंजनेरी हा नाशिक - त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे. हे हनुमंतरायांचे जन्मस्थान आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते. मुळेगावच्या वाटेनेही गडावर जाता येते. गडावरून बुधली नावाची अवघड वाटही खाली उतरते. अंजनेरी हे भगवान हनुमंत राया यांचे जन्मस्थान आहे येथे अंजनेरी मातेने हजारो वर्ष तपश्चर्या केलेली आहे. तसेच या पर्वतावर इंद्राणी इंद्राने इंद्राने तपश्चर्या केल्यामुळे याला इंद्र पर्वत सुद्धा म्हणतात. अंजनेरी पर्वतावर जाताना एक हनुमान कुंड आहे ते हनुमंतरायांच्या पायाने निर्माण झालेले आहे. त्याच्या उजव्या बाजूला थोडे पुढे गेल्यावर एक गुहा लागते त्याच गुहेमध्ये हनुमंत रायाला अंजनी मातेने जन्म दिलेला आहे. वायु देवाने गुहेत प्रवेश करून अंजनी मातेला दीक्षा दिली तिथे एक मोठे छिद्र पडलेले आहे, तिथे हनुमंत रायाची अंजनी माते सोबत एक मूर्ती आहे. अंजनेरी पर्वतावर विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. तसेच हनुमंतरायाच्या पायाने तयार झालेले तळे आजही प्राण्यांची तहान भागवते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अंजनेरी
थोडक्यात पण महत्त्वाचे.