शतपत्रे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

शतपत्रे ही गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांनी लिहिली आहेत. लोकहितवादी हे स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ विचारवंत आणि प्रखर देशभक्त होते.

समाजात बदल घडवण्याचा, समाज सुधारण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणून लोकहितवादींनी लेखणी हातात घेतली आणि लहान-थोर सगळयांना हिताच्या गोष्टी सांगणारी तब्बल १०८ पत्रे त्यांनी लिहिली. शंभर पत्रे या अर्थाने शतपत्रे म्हणून ही पत्रे प्रसिद्ध आहेत. इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, नवीन विद्या, परंपरा, धर्मकारण, जातिभेद, स्त्रीजीवन अशा कितीतरी विषयांवर ते सतत लिहीत राहिले. ‘प्रभाकर’ या त्यावेळच्या साप्ताहिकातून त्यांची शतपत्रे प्रसिद्ध झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →