शंकर काशिनाथ गर्गे

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

नाट्यछटाकार दिवाकर (शंकर काशिनाथ गर्गे) (जन्म : १८ जानेवारी,१८८९; मृत्य्पू : १ ऑक्टोबर, १९३१) हे मराठी लेखक होते. मराठीत नाट्यछटा हा लेखनप्रकार रुजवण्याचे श्रेय दिवाकर यांना दिले जाते. त्यांनी एकूण ५१ नाट्यछटा लिहिलेल्या आहेत. 'महासर्प' ही त्यांनी लिहिलेली पहिली नाट्यछटा होय. 'मग तो दिवा कोणता', 'पंत मेले राव चढले', 'वर्डस्वर्थचे फुलपाखरूं', 'चिंगी महिन्याची झाली नाही तोच', 'शिवी कोणा देऊं नये', 'फाटलेला पतंग' इ. त्यांच्या विशेष गाजलेल्या नाट्यछटा आहेत. पंत मेले राव चढले या नाट्यछटेच्या नावानेच वाक्प्रचारही मराठीत रुजलेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →