वासुदेव बळवंत पटवर्धन ऊर्फ कवी वसंत (जन्म : १५ मे १८७०; - २६ ऑक्टोबर १९२१) हे एक मराठी कवी व काव्यसमीक्षक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यास, व माध्यमिक शिक्षण नागपूरला झाले. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून १८९३ साली बी.ए.ची पदवी मिळविली. त्यानंतर ते पुण्याला प्रथम न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक आणि नंतर फर्ग्युसनमध्ये प्राध्यापक झाले.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात इंग्लिश शिकवणारे ते एक व्यासंगी प्राध्यापक होते. तेथे ते शेक्सपियर आणि बाउनिंग उत्तम शिकवत. मराठी भाषेचा माध्यमिक शिक्षणात, विद्यापीठांत सर्वत्र वाजवी हक्काने प्रवेश व्हायला हवा या न्यायमूर्ती रानड्यांनी चालविलेल्या सर्व चळवळीत वासुदेव बळवंत पटवर्धन अग्रभागी असत. पटवर्धन स्वतःही कवी होते. वसंत या टोपणनावाने त्यानी कविता लिहिल्या आहेत.
शंकर काशिनाथ गर्गे ऊर्फ दिवाकर (१८८९-१९३१) यांनी मोनोलॉगसदृश जो नवा साहित्यप्रकार मराठीत आणला त्या प्रकाराला वा.ब पटवर्धनांनी ड्रॅमॅटिक शॅडो हे इंग्रजी आणि नाट्यछटा हे मराठी नाव सुचविले. दिवाकरांना नाट्यछटा लिहिण्याची प्रेरणा पटवर्धनांनीच दिली होती.
पटवर्धनांनी 'विनायकांची कविता' या पुस्तकाला कवी विनायक यांच्या काव्याची समीक्षा कराणारी प्रस्तावना लिहिली आहे.
वासुदेव बळवंत पटवर्धन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.