व्हिक्टोरिया विद्यापीठ
हे मेलबर्न या शहरातील जुने विद्यापीठ आहे. या संस्थेची सुरुवात एक तंत्रशिक्षण संस्था म्हणून झाली व पुढे विद्यापीठाचे स्वरूप मिळाले. आज या विद्यापीठाचे फ्लिंडर्स स्ट्रीट, फूटस्क्रे हे स्थानीय कँपस आहेत. या शिवाय सिंगापुर व चीन येथे सहकारी संस्था आहेत.
या विद्यापीठात आर.एम.आय.टी. विद्यापीठ येथे असलेल्या पद्धतीसारखेच द्वीस्तरीय तंत्रशिक्षण व पदवी असे अभ्यासक्रम आहेत.
अनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. सॅपच्या युनिव्हर्सिटी अलायन्स प्रोग्रामचा भाग आहे.
हे विद्यापीठ ऑस्ट्रेलियामध्ये पदव्युत्तर सॅप (एस.ए.पी.) विषयक कोर्सेस शिकवणारे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
यात मिळणारी पदवी मास्टर ऑफ बिझिनेस इ.आर.पी सिस्टीम्स अशी आहे.
व्हिक्टोरिया विद्यापीठ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?