डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

या विषयातील रहस्ये उलगडा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील विद्यापीठ आहे. मराठवाडा विभागातील हे सर्वात प्रमुख विद्यापीठ आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच तत्कालीन औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या भागाचे नागसेनवन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५८ या वर्षी मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. पुढे नामांतराच्या लढ्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठ याचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामविस्तार केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →