व्यालअथवा 'यली' हा पुरातन मंदिरांच्या शिल्पकलेत कोरल्या जाणारा एक काल्पनिक प्राणी आहे.भारतात बहुतेक पुरातन मंदिरातील कोरीवकामात हा आढळतो. त्याचे शरीर मानवाचे व डोके वेगळ्याच पशूचे अथवा शरीर घोड्याचे अथवा कोणत्याही पशूचे व डोके वेगळ्याच पशूचे असे कोरलेले असते.व्यालमूर्ती ही साधारणतः कोरीव कामातच आढळते. व्याघ्रव्याल (डोके वाघाचे), अजव्याल (डोके बोकडाचे), अश्वव्याल (डोके अश्वाचे) असे विविध प्रकार यात असतात.ही कल्पना शिल्पकारास गजमुखावरून सुचली असेल असा अदमास आहे.
याचा वापर दक्षिण भारतातील मंदिरांच्या बांधकामात व्यापकपणे केलेला आढळतो.
व्यालमूर्ती
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?