अहिल्यानगर पासून २० किलोमीटर अंतरावर आगडगाव येथे काळभैरवनाथाचे पुरातन देवस्थान आहे. या छोट्या मंदिरावर शिलालेख नाही. हे मंदिर मोठे दगड आणि शिळांनी बांधलेले आहे. पुराणात असलेल्या नोंदीवरून आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते. या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारीशेजारीच आहेत. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काळभैरवनाथ मंदिर (आगडगाव)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.