भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात.
व्याकरण हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्द व वाक्य) एक आहे.
भाषाशास्त्रानुसार व्याकरण हे एखाद्या नैसर्गिक भाषेतील शब्द, वाक्ये व वाक्प्रचार आदींच्या निर्मितीचे व बांधणीचे नियमन करते.
प्रत्येक भाषेस त्याचे वेगळे व्याकरण असते. "इंग्रजी व्याकरण" हे इंग्रजी भाषेतच असलेल्या नियमांचा एक संच आहे. इंग्रजी व्याकरण हे या नियमांचा अभ्यास वा त्याचे विश्लेषण करणे होय. एखाद्या भाषेच्या व्याकरणाचे वर्णन करणाऱ्या संदर्भ पुस्तकास व्याकरण असे म्हणतात.
व्याकरण
थोडक्यात पण महत्त्वाचे.