व्यक्ती आणि वल्ली (१९६६) हा मराठी भाषेतील पु.ल. देशपांडे यांचा कथासंग्रह आहे. मौज प्रकाशनाकडून तो प्रसिद्ध करण्यात आला होता. हे पुस्तक मराठीतल्या सर्वोत्कृष्ट आणि सर्वात प्रसिद्ध पुस्तकांमध्ये गणले जाते. बऱ्याच खाजगी संकेतस्थळांकडून याचा समावेश मराठीतल्या पहिल्या दहा पुस्तकांमध्ये केला गेला आहे.
या पुस्तकावर आधारित नमुने नावाची दूरदर्शन मालिका सोनी सब या वाहिनीने तयार केली.
पार्श्वभूमी:
इ.स. १९४४ मध्ये 'अभिरुची' नावाच्या मासिकात पु.लं.नी 'अण्णा वडगावकर' नावाचे काल्पनिक व्यक्तिचित्र लिहिले. तेव्हापासून इ.स. १९६१ पर्यंत लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा या संग्रहात समावेश केला गेला आहे. पहिल्या ४ आवृत्यांत १८ व्यक्तिचित्रांचा समावेश होता. नंतर "तो" आणि "हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका" ही दोन व्यक्तिचित्रे पुस्तकात घालण्यात आली.
व्यक्ती आणि वल्ली
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.