व्यंजन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मराठीत एकूण ४१ व्यंजने आहेत. ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. या ४१ व्यंजनांपैकी ३४ व्यंजनाचे पाच प्रकारात विभाजन केले जाते.



स्पर्श व्यंजनण (ही २५ आहेत).

अर्धस्वर व्यंजन (ही चार आहेत.य,र,ल,व)

उष्मा, घर्षक व्यंजने (ही तीन आहेत.श,ष,स)

महाप्राण व्यंजन (हे एक आहे.ह)

स्वतंत्र व्यंजन (हे एक आहे.ळ)

स्पर्श व्यंजने (एकूण २५):

वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, टालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात.

उदा. क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म

स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.



कठोर वर्ण

मृदु वर्ण

अनुनासिक वर्ण

१. कठोर वर्ण (१३) –

ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.यानाच श्वास, अघोष असे म्हणतात.



उदा.: क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ, श, ष, स.

२. मृदु वर्ण (३५)–

ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.

यांनाच नाद, घोषवर्ण असे म्हणतात.



उदा.: अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ ए, ऐ, ओ, औ, अं, आः,

ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ

य, र, ल, व,

ह,

ळ,

ङ, ञ, ण, न, म

३. अनुनासिक वर्ण –

ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केला जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.



उदा.: ङ, ञ, ण, न, म



ज्याच्या पूर्ण उच्चारासाठी स्वराची मदत घ्यावी लागते अशा भाषिक वर्णाला व्यंजन म्हणतात. व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी तोंडातील काही अवयवांमार्फत हवा अडवली जाते. उदा० जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन मूर्धन्य व्यंजनांचा उच्चार होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →