वॉशिंग्टन, डी.सी.

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

वॉशिंग्टन, डी.सी.

वॉशिंग्टन, डी.सी. (इंग्लिश: Washington, D.C.; अधिकृत नावः डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, District of Columbia) ही अमेरिका देशाची राजधानी आहे. १६ जुलै १७९० रोजी अमेरिकन काँग्रेसने राष्ट्रीय राजधानीसाठी एक संघीय जिल्हा निर्माण करण्यास मान्यता दिली. त्यानुसार मेरीलँड व व्हर्जिनिया राज्यांच्या मधे पोटॉमॅक नदीच्या काठावरील एका जमिनीच्या तुकड्यावर वॉशिंग्टन, डी.सी. शहर वसवले गेले. ह्या शहराला अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन याचे नाव देण्यात आले. डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया हा कोणत्याही राज्याचा भाग नसून एक स्वतंत्र जिल्हा आहे व अनेक वेळा त्याला अमेरिकेचे ५१वे राज्य असे मानले जाते.

२०११ साली ६.१८ लाख लोकसंख्या असलेले वॉशिंग्टन हे अमेरिकेमधील २४व्या क्रमांकाचे मोठे शहर तर ५५.८ लाख लोकवस्ती असलेले महानगर क्षेत्र देशात सातव्या क्रमांकावर आहे. अमेरिकन सरकारच्या तीनही प्रशासकीय शाखा (संसद, राष्ट्राध्यक्ष व न्यायालय) वॉशिंग्टन शहरात आहेत. तसेच येथे जगातील १७६ देशांचे दूतावास, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व इतर अनेक जागतिक संस्थांची मुख्यालये आहेत. ह्या व्यतिरिक्त येथे अनेक ऐतिहासिक संग्रहालये व वास्तू आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →