वॉर्नर ब्रदर्स एंटरटेनमेंट इंक ही एक अमेरिकन चित्रपट आणि मनोरंजन कंपनी आहे, जी सामान्यतः वॉर्नर ब्रदर्स, वॉर्नर ब्रोझ किंवा WB म्हणून संक्षेपात ओळखली जाते. ही वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीची उपकंपनी असून तिचे मुख्यालय बर्बंक, कॅलिफोर्निया येथील वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आहे.
हॅरी, अल्बर्ट, सॅम आणि जॅक वॉर्नर या चार भावांनी १९२३ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीने अॅनिमेशन, टेलिव्हिजन आणि व्हिडिओ गेम्समध्ये विविधता आणण्यापूर्वी अमेरिकन चित्रपट उद्योगात एक प्रमुख कंपनी म्हणून स्वतःची स्थापना केली. ही "बिग फाइव्ह" या प्रमुख अमेरिकन कंपन्यांपैकी एक आहे. तसेच ही कंपनी मोशन पिक्चर असोसिएशन (एमपीए) ची सदस्य देखील आहे.
ही कंपनी वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स ग्रुप या फिल्म स्टुडिओ विभागासाठी ओळखली जाते, ज्यामध्ये वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स, न्यू लाइन सिनेमा, वॉर्नर अॅनिमेशन ग्रुप, कॅसल रॉक एंटरटेनमेंट आणि डीसी फिल्म्स या उपकंपन्यांचा समावेश आहे. कंपनीच्या इतर मालमत्तेमध्ये वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन स्टुडिओज ही टेलिव्हिजन निर्मिती कंपनी; व्हिडिओ गेमची शाखा वॉर्नर ब्रदर्स इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट यांचा समावेश आहे; तसेच ब्रॉडकास्ट टेलिव्हिजन नेटवर्क असलेल्या द CW मध्ये ५०% भागीदारी आहे, ज्याची पॅरामाउंट ग्लोबलकडे सह-मालकी आहे.
वॉर्नर ब्रदर्स प्रकाशन, व्यापार, संगीत, थिएटर आणि थीम पार्कमध्ये विविध विभाग देखील चालवते. लूनी ट्यून्स मालिकेचा भाग म्हणून टेक्स एव्हरी, बेन हार्डवे, चक जोन्स, बॉब गिव्हन्स आणि रॉबर्ट मॅककिम्सन यांनी तयार केलेले बग्स बनी हे कार्टून पात्र या कंपनीचे अधिकृत शुभंकर आहे.
वॉर्नर ब्रोझ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?