वॉर्नर लेरॉय बॅक्स्टर (२९ मार्च १८८९ -७ मे १९५१) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता होता. बॅक्स्टरला १९२८ च्या इन ओल्ड ऍरिझोना चित्रपटातील सिस्को किडच्या भूमिकेसाठी ओळखले जाते, ज्यासाठी त्याने दुसरे ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला होता.
द ग्रेट गॅट्सबी (१९२६) आणि द ऑफुल ट्रुथ (१९२५) या चित्रपटांमध्ये बॅक्स्टरने मूक चित्रपटांमधून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली.
चित्रपट उद्योगातील योगदानासाठी, बॅक्स्टरला हॉलीवूड वॉक ऑफ फेममध्ये एक स्टार मिळाला आहे.
वॉर्नर बॅक्स्टर
थोडक्यात पण महत्त्वाचे.