वैद्य खडीवाले

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

वैद्य परशुराम यशवंत खडीवाले (जन्म : इ.स. १९३२; - २८ डिसेंबर २०१७) हे एक नावाजलेले आयुर्वेदतज्ज्ञ आणि आयुर्वेदिक उपचारांवर नियतकालिकांतून लिहिणारे एक मराठी लेखक होते. त्यांची पुण्यामध्ये ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था’ आहे. त्यांचे चिरंजीव विनायक प. खडीवाले हेही वैद्य आहेत.

वैद्य प.य. खडीवाले हे भारतीय हवाई दलातून सुमारे सतरा वर्षे नोकरी करून एप्रिल १९६८ साली निवृत्त झाले. त्यांचे वडील कै. यशवंत हरी वैद्य म्हणजेच खरे खडीवाले ऑगस्ट १९६७ साली गेले. त्या काळी वडिलांचा औषध निर्माणाचा मोठा व्याप घरी व दुसऱ्या ठिकाणी होता. त्याकडे पहायला कोणी नव्हते. प.य. खडीवाले यांचे धाकटे बंधू डी.एस.ए.एफ. ही आयुर्वेदातील पदवी व एमबीबीएस या पदव्या संपादन केलेले होते. परंतु, त्यांचा आयुर्वेदाच्या कार्यात विशेष रस नव्हता. ज्या काळात खडीवाले हे भारतीय हवाई दलात नोकरी करीत होते त्या काळात त्यांच्या वडिलांनी १९६४ सालीच मृ्त्युपत्र लिहिले होते. त्यात ‘परशुरामाने आयुर्वेदाचे शिक्षण घ्यावे. औषधी कारखान्याकडे लक्ष द्यावे,’ अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरविण्यासाठीच प.य. खडीवाले यांनी हवाई दलातून निवृत्त झाल्यावर पुण्यात येऊन सोळा हजार चौरस फुटांची जागा घेतली व हरी परशुराम औषधालय सुरू केले. त्यानंतर दुसऱ्या एका ठिकाणी आयुर्वेद औषधविक्री केंद्र सुरू केले. तेव्हापासून आतापर्यंत वैद्य प.य. खडीवाले आयुर्वेदातील औषधे निर्माण करण्याच्या क्षेत्रात काम करत होते.

वैद्य प.य.खडीवाले हे पुण्यात .आयुर्वेदासंदर्भात सामान्य नागरिकांचे वर्ग घेत असत. आयुर्वेदाच्या २०० ते ३०० औषधांचे महत्त्व समजावून सांगतात. त्याशिवाय त्याबाबतच्या श्लोकांचे पाठांतर करायला लावत. हे काम ते विनामोबादला अनेक वर्षांपासून करत होते. त्यांनी भारतात धन्वंतरी याग कशाप्रकारे व्हावा, याचे तंत्र सांगून तो सुरू केला. पुणे विद्यापीठात त्यांनी स्वखर्चातून औषधी वनस्पतींचे उद्यान उभारले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →