वैदिक धर्म

या विषयावर तज्ञ बना.

वैदिक साहित्यात सांगितलेल्या नीती-नियमांना वैदिक धर्म (सनातन धर्म) असे म्हणतात. संहिता म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे या सर्व साहित्याला 'वैदिक साहित्य' म्हणले जाते.

वैदिक धर्मामध्ये वेदांना प्रमाण मानणे,त्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करणे या संकल्पनांचा समावेश होतो.

वैदिक धर्माचा विकास प्रारंभिक वैदिक कालखंडात (इ.स.पू. 1500–1100) झाला होता, पण त्याच्या मुळा सिंटस्थ संस्कृतीत (इ.स.पू. 2200–1800) आणि त्यानंतरच्या मध्य आशियातील अँड्रोनोवो संस्कृतीत (इ.स.पू. 2000–900) आणि कदाचित सिंधू खोरे संस्कृत (इ.स.पू. 2600–1900) सुद्धा आहेत.

वैदिक साहित्य आरंभकालीन व उत्तरकालीन वैदिक आर्य यांची श्रेष्ठ कामगिरी लिखित संस्कृतीच्या अभ्यासाचे उदाहरण होय, आरंभीच्या आऱ्यांना लेखन कला अवगत नवती परंतु वैदिक साहित्य एका पिढीकडून पुढील पिढीकडे मौखिक परंपरेने संक्रमित होत गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →