वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२१-२२

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२१-२२

वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) खेळण्यासाठी नोव्हेंबर २०२१ दरम्यान पाकिस्तानचा दौरा केला. दोन्ही संघांनी ही मालिका नोव्हेंबरमध्ये झिम्बाब्वेमध्ये झालेल्या २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी वापरली. वेस्ट इंडीज महिलांनी मार्च २००४ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये महिला वनडे सामने खेळले.

मालिका सुरू व्हायच्या आधी पाकिस्तानी संघाच्या कर्णधारसहित ५ पाच खेळाडूंना कोव्हिड-१९ रोगाची लागण झाली. त्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी पीसीबी ने सिद्रा नवाझकडे पाकिस्तानचे कर्णधारपद सोपविले. वेस्ट इंडीजने तिनही सामने जिंकत मालिकेत ३-० असा विजय मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →