वीर प्रकारच्या कॉर्व्हेट

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

वीर प्रकारच्या कॉर्व्हेट भारतीय आरमाराच्या युद्धनौकांचा ताफा आहे. या नौकांची बांधणी सोव्हिएत आरमाराच्या टारांटुल प्रकारावर आधारित आहे. हा ताफा २२व्या घातक क्षेपणास्त्र नौका स्क्वॉड्रनचा भाग आहेत.

भारतीय आरमाराने या प्रकारच्या १३ नौका सेवेत घेतल्या तर इतर दोन नौकांची मागणी रद्द केली. २०२२मध्ये या प्रकारच्या ११ कॉर्व्हेट सेवारत आहेत तर आयएनएस वीर आणि आयएनएस. निपात यांना २०१६मध्ये निवृत्ती देण्यात आली.

या १३ पैकी आठ नौकांनी २५व्या घातक क्षेपणास्त्र नौका स्क्वॉड्रनमधील जुन्या नौकांचे नाव देण्यात आले आहे, ज्यांनी १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या दोन विनाशिका, एक सुरूंगपेरक जहाज आणि इतर अनेक रसदी नौकांना जलसमाधी दिली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →