वि.वि. करमरकर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

विष्णू विश्वनाथ करमरकर (जन्म: नाशिक; ११ ऑगस्ट १९३८) हे मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक समजले जातात. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्येच झाले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. झाले.

करमरकरांचे वडील डॉ. वि.अ. करमरकर हे निष्णात डॉक्टर होते आई सुशीलाताई यांनी करमरकरांना संस्कारित केले. रत्‍ना थोरात व माणिक मराठे या त्यांच्या भगिनी.

विष्णू विश्वनाथ करमरकर यांनी पत्रकारितेची सुरुवात पत्रकारितेची सुरुवात नाशिकचे रसरंग साप्ताहिक आणि मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते एस.एम. जोशी चालवत असलेल्या दैनिक लोकमित्रमधून केली. जून १९६२मध्ये करमरकर महाराष्ट्र टाइम्सच्या क्रीडा विभागाचे प्रमुख झाले. सहसंपादक (क्रीडा) या नात्याने ते महाराष्ट्र टाइम्समधील क्रीडा पानावे संपादन करू लागले. त्यांची ही पत्रकारिता खेळाच्या बातम्या, क्रीडासमीक्षणे व स्तंभलेखन यांविषयी मराठी माणसाची जिज्ञासा पुरी करू लागली. आणि याचा परिणाम म्हणून सर्वच मराठी वृत्तपत्रांत हळूहळू क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध झाले.

वर्तमानपत्रातून दैनंदिन क्रीडा समीक्षा लेखन करणारे वि.वि.करमरकर यांचे स्तंभलेखन वाचकांना आवडू लागले. पुढे पुढे, खेळाचे हौशी स्वरूप बदलत गेले आणि तो एक पैसे मिळविण्याचा उद्योग झाला. अनेक उद्योगसमूह क्रीडाक्षेत्रात रस घेऊ लागले. अशांनी बांधलेली स्टेडियम्स, त्यांवरील अफाट खर्च, आणि त्यासाठी होणारा भ्रष्टाचार यावर इ.स. १९९३पासून करमरकरांचे लिखाण प्रकाश टाकू लागले. सुरेश कलमाडी यांच्या खोट्या क्रीडाप्रेमावर ते सतत टीका करत. इ.स. १९८२साली दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी स्टेडियमे बांधताना सुमारे शंभर मजूर मरण पावले, त्यांची नावेही समजली नाहीत. ’रक्तरंजित’ या मथळ्याखाली त्यांनी या मजुरांची हकीकत वाचकांना माहित करून दिली.

भारतीय खेळाडू हे जगातील जमेका, क्यूबासारख्या अगदी छोट्या छोट्या देशांतील खेळाडूंपेक्षा किती अधिक मागासलेले आहेत हे करमरकरांनी वाचकांच्या नजरेस आणले. जगातील अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, क्रीडा वैद्यक तज्ज्ञ यांच्या जिवंत अनुभवांचे करमरकरांनी शब्दांकन करून प्रसिद्ध केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →