विष्णु मनोहर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

विष्णु मनोहर

विष्णु मनोहर (१८ फेब्रुवारी, १९६८ - हयात) हे एक मराठी उद्योजक, दूरचित्रवाहिनी सूत्रसंचालक तथा बल्लवाचार्य (शेफ) आहेत. विष्णू मनोहर यांचे विष्णूजी की रसोई नावाने उपहारगृह शृंखला नागपूर, पुणे, औरंगाबाद, इंदूर, ठाणे, अमरावती आणि कल्याण या शहरांत आहेत.

सलग ५३ तास स्वयंपाक करून विश्व विक्रम करणारे ते जगातील एकमेव शेफ आहेत. 'सर्वात लांब पराठा' ५ फूट लांब आणि ५ फूट रुंद असल्याने, तो आतापर्यंत बनवला गेला होता. मनोहर हे एकमेव शेफ आहेत ज्यांनी तीन तासात ७००० किलोची महा मिसळ बनवण्याचा विश्वविक्रम केला आहे. मनोहरने २० डिसेंबर २०१८ रोजी भारतात ३२०० किलो वांग्याचे भरीत (बैंगण भरता/वांगी) तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांनी ३००० किलो खिचडी बनवून नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. नंतर एका भांड्यात ५००० किलो खिचडी दलिया शिजवून त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला आहे. आपल्या क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरी बद्दल जून २०२५ मध्ये नागपूर येथे पार पडलेल्या बहु प्रतिष्ठित फेमस अवॉर्ड्स २०२५ या कार्यक्रमात माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →