डॉ. विश्वनाथ त्रिपाठी (१६ फेब्रुवारी, इ.स. १९३३:बिशकोहर, बस्ती जिल्हा, उत्तर प्रदेश)हे हिंदीतील एक नावाजलेले लेखक आहेत. त्यांचे शिक्षण बनारस विश्व हिंदू विद्यापीठ व पंजाब विद्यापीठात झाले.
डॉ. त्रिपाठी हे लेखक होण्यापूर्वी शिक्षक होते. त्यांनी पत्रकारिता व इतिहास हे विषय शिकवले आहेत. समीक्षा लेखनाखेरीज त्यांनी कादंबरीलेखन व काव्यरचनाही केल्या आहेत.
त्रिपाठींनी लिहिलेले व्योमकेश दरवेश हे पुस्तक त्यांचे गुरू आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी यांच्याविषयी आहे. त्यात जीवन, आठवणी, आत्मकथन व इतिहास यांच्या जोडीला समीक्षाही आहे.
विश्वनाथ त्रिपाठी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?