विशाखापट्टणम रेल्वे स्थानक

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

विशाखापट्टणम रेल्वे स्थानक

विशाखापट्टणम जंक्शन (तेलुगू: విశాఖపట్నం జంక్షన్) हे आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. विशाखापट्टणम भारतीय रेल्वेच्या पूर्व तटीय रेल्वे क्षेत्रामध्ये असून ते वॉल्टेअर रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. हावडा-चेन्नई हा भारताच्या पूर्व किनारपट्टी भागातून धावणारा प्रमुख रेल्वेमार्ग विशाखापट्टणम शहरामधून जात असला तरीही विशाखापट्टणम स्थानक ह्या मार्गावर नाही. विशाखापट्टणम हे एक टर्मिनल असून येथे येणाऱ्या सर्व गाड्यांना एकाच मार्गाने परतावे लागते.

विशाखापट्टणम व हैदराबाद रेल्वे स्थानकांदरम्यान धावणारी गोदावरी एक्सप्रेस ही येथील सर्वात प्रसिद्ध रेल्वेगाडी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →