डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विलिंग्डन महाविद्यालय हे महाराष्ट्राच्या सांगली शहरातील महाविद्यालय आहे. २२ जून, १९१९ रोजी स्थापन झालेल्या या महाविद्यालयास तत्कालीन बाँबे प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नर फ्रीमन फ्रीमन-थॉमस, लॉर्ड विलिंग्डनचे नाव देण्यात आले.. आर.पी. परांजपे हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य येथील पहिले प्रभारी प्राचार्य होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सेटलवाड त्यावेळी उपस्थित होते. गोविंद चिमणाजी भाटे हे येथील पहिले प्राचार्य होते. त्यानंतर बी जी.सप्रे आणि पी एम लिमये हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय प्राचार्यहोते. सध्या डॉ भास्कर विनायक ताम्हनकर हे प्राचार्य आहेत.
शिवाजी विद्यापीठाशी संल्गन असलेले हे महाविद्यालय सांगलीच्या विश्रामबाग भागात आहे. सांगली व मिरज संस्थान ग्रंथालय हे अतिशय दुर्मिळ ग्रंथांचे दालन या महाविद्यालयाचा भाग आहे.
विलिंग्डन महाविद्यालय (सांगली)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.