विलास सारंग

या विषयावर तज्ञ बना.

विलास गोविंद सारंग (जन्म : इ.स. १९४२, कारवार; मृत्यू : मुंबई, १४ एप्रिल २०१५) हे नवतेचा आग्रह धरणारे एक मराठी लेखक होते. विलास सारंग यांचे शिक्षण मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून झाले.

मराठीतली त्यांची काही पुस्तके त्यांनीच मूळ इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकांचे अनुवाद आहेत. त्यांची मराठीत अकरा व इंग्रजीत आठ पुस्तके आहेत आणि अनेक संपादित-निवडक संग्रहांत त्यांच्या इंग्रजी कथा आहेत. इंग्रजी लेखक काफ्काशी त्यांची तुलना होत असे. त्यांना मराठीतले काफ्का असे सुद्धा म्हणत. विलास सारंग १९६०पासून लिहीत होते. त्यांनी मराठीत लिहिले; व इंग्रजीमध्येही लिहिले. त्यांनी प्रथम मराठीत लिहून नंतर त्या लेखनाचे इंग्रजीकरण केले; प्रथम इंग्रजीत लिहून नंतर त्याचे मराठीकरणही केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →