विलास संदिपान भुमरे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

विलास संदीपनराव भुमरे (१९८६ - ) हे एक मराठी राजकारणी आहेत. हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे पैठणमधून महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले.

यांचे वडील संदीपनराव भुमरे हे सलग पाच वेळा या मतदारसंघाचे आमदार होते. विलास भुमरे जिल्हा परिषदेचे माजी वित्त सभापती होते. त्यांनी २०१३ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद कला सरदार दलिपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातून एमए पूर्ण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →