सुनील ज्ञानदेव कांबळे हे भारतीय राजकारणी आहेत. हे २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे सदस्य म्हणून पुणे कॅन्टोन्मेंटमधून महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर निवडून गेले. हे १९९२पासून पुणे महापालिकेत नगरसेवक होते. यांची मार्च २०१९मध्ये त्यांची पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते.. भाजप मंत्री दिलीप कांबळे यांचे ते धाकटे भाऊ आहेत. यांनी अभाविपमध्ये आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यांनी पश्चिम बंगालच्या २०२१ च्या निवडणुकीत बालूरघाट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचार आणि बूथ स्तरावर संपर्क साधण्याचे भाजपच्या बाजूने काम केले. कांबळे हे सध्या महाराष्ट्र विधिमंडळातील अनुसूचित जाती विधी समितीचे सदस्य आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुनील कांबळे
या विषयातील रहस्ये उलगडा.