विलास चाफेकर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

विलास चाफेकर हे पुण्यातील वंचित विकास या संस्थेचे संस्थापक आहेत. इतर अनेक कामांसमवेत देवदासीना मूळ प्रवाहात आणण्याचे कार्य ही संस्था करते. चाफेकरांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

विलास चाफेकर यांनी मुंबई विद्यापीटातून त्यानी सुवर्णपदक मिळवीत एम.ए. (हिंदी) केले आहे, त्याशिवाय ते पुणे विद्यापीठाचे M.Ed. आहेत. 'Education science : Comparative studies of education -various countries'हा प्रबंधासाठीचा विषय घेऊन पीएच.डी. करत होते, पण ते काम अपुरे राहिले. वयाच्या १७व्या वर्षी विलास चाफेकरांनी भटकी मुले, झोपडपट्टीतील मुले आदींच्या उन्नतीसाठी समाजकार्यास सुरुवात केली. वयाच्या ७५व्या वर्षीदेखील ते शिक्षण, आरॊग्य, भूमिहीनांची उन्नती, भटक्या जमाती यांसारख्या सामाजिक विषयांत सक्रिय आहेत. 'नीहार' ही त्यांनी त्यांनी वेश्यांच्या मुलांसाठी वसवलेली वसाहत आहे. हिची सुरुवात ५ जुलै १९८९ रॊजी झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →