राजन इंदुलकर हे महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे एक समाजसेवक आहेत. त्यांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर कार्य करणारी 'श्रमिक सहयोग' ही संस्था स्थापन केली आहे. चिपळूण तालुक्यातील अलोरे गावाजवळील कोळकेवाडी येथे या संस्थेतर्फे 'प्रयोगभूमी' नावाची वंचित मुलांसाठीची निवासी शाळा चालवली जाते.
‘श्रमिक सहयोग’ या संस्थेची १९८४ साली स्थापना झाली. शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी काम करावे या उद्देशाने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व लोकचळवळीचे मार्गदर्शक दत्ता सावळे यांच्या सहकार्याने संस्थेच्या प्रयोगशील कार्यकर्त्यांंनी वेळोवेळी चर्चासत्रे घेऊन दारिद्ऱ्य भोगणाऱ्या धनगर आणि कातकरी समाजातील वंचितांच्या शिक्षण विषयक शोधाचे कार्य १९९२ पासून हाती घेतले. चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगरांत राहणाऱ्या धनगर आणि कातकरी समाजातील मुलांसाठी वस्त्यावस्त्यांवर जाऊन मुलांना अक्षर ओळख करून देण्याचा प्रयत्न चालवला. आम्ही ठरवू तेच शिक्षण तीच पद्धती असा आग्रह धरल्यामुळे या वैविध्यपूर्ण समाजांना शिक्षणासाठी वंचित रहावे लागले. ही गोष्ट लक्षात घेऊन निसर्गाच्या जडण घडणीसोबत वाढलेल्या या मुलांना आवडेल, समजेल आणि ते विद्यार्थी, शाळेपासून दूर न पळता शैक्षणिक प्रवाहात सामील होतील अशा प्रकारचे शिक्षण या वस्त्यांमध्ये जाऊन देण्याचे काम संस्थेने केले. अगदी या विद्यार्थ्यांच्या मागूनच शाळा फिरवली असे म्हटल्यास हरकत नाही.
राजन इंदुलकर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.