विमल मोरे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

विमल दादासाहेब मोरे (माहेरच्या विमल नामदेव भोसले; २० सप्टेंबर, १९७०) या गोंधळी या भटक्या समाजातील भटक्या-विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्या पुण्यात ९-२० ऑगस्ट २०१४ रोजी पार पडलेल्या, महाराष्ट्रातील पहिल्या विद्रोही स्त्री साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.

महाविद्यालयीन शिक्षण न झालेल्या मोरे यांचे लिखाण गुलबर्गा, गोंडवाना, मुंबई आदी विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नेमेले गेले आहे.

त्यांचे पती दादासाहेब मोरे हे सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →