विप्रो टेक्नॉलॉजीज (बीएसई.: 507685, एनएसई.: WIPRO) ही अझीम प्रेमजी यांच्या विप्रो कारपोरेशन या उद्योगसमुहातील सर्वात मोठी कंपनी आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ४.३ अब्ज अमेरिकन डॉलर उत्पन्न, ९४००० कर्मचारी आणि जगभरातील ५३ विकसन केंद्रे असलेली विप्रो टेक्नोलॉजीज ही भारतीय माहिती तंत्रज्ञान झेत्रातील महसुलाद्वारे क्रमांक ३ची कंपनी आहे. सिक्स्-सिग्मा, एस.इ.आय.-सी.एम.एम., बी.एस.-१५००० ही गुणवत्तेची विविध आंतरराष्ट्रीय मानांकने विप्रोच्या विकसन केंद्रांना प्रदान करण्यात आली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विप्रो
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?