डॉ. वि.म. दांडेकर, पूर्ण नाव : विनायक महादेव दांडेकर (जन्म :६ जुलै, इ.स. १९२० - - इ.स. ३१ ऑगस्ट, १९९५) हे महाराष्ट्रातील जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ होते. संख्याशास्त्रज्ञ म्हणूनही गाजलेल्या दांडेकरांचा जन्म सातारा येथे झाला. पाणी, शेती, बेरोजगारी या क्षेत्रात त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे.
वि.म. दांडेकरांनी राष्ट्रीय उत्पन्न, प्राथमिक शिक्षणातील त्रुटी, खेडेगावांचा व शेतीचा अभ्यास इ. अनेक विषयांचा संख्याशास्त्रावर आधारित विश्लेषणात्मक अर्थशास्त्रीय अभ्यास केला. शेतीसाठी पाणी वापरताना, पाण्याचे पिकाप्रमाणे नियोजन कसे करावे, उसाची लागवड कमी करून इतर पिकांना पाणी देणे, भाकड गुरांची कत्तल करावी, इ. त्यांची परखड मते शास्त्रीय कसोट्यांवर आधारलेली होती व ती अनेकांच्या पचनी पडणे अवघड असल्याने त्यांची अंमलबजावणी झाली नाही.
विनायक महादेव दांडेकर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.